मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेता रजनीकांतचं कौतुक केलं आहे. सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. सिनेसृष्टीतील हा सर्वात मानाचा पुरस्कार समजला जातो. त्यामुळे त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रजनीकांत यांचं अभिनंदन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांच्या फेसबुक पोस्टवरुन रजनीकांत यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या हा अभिनेत्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन.'


रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न...

Posted by Raj Thackeray on Thursday, 1 April 2021

रजनीकांत यांना ३ मे रोजी ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली. रजनीकांत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सिनेमाच्या माध्यमातून लोकांचं मन जिंकलं आहे. त्यांचे जगभरात लाखो चाहते आहेत.