शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला
शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली.
मुंबई: भारतीय भांडवली बाजारात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेन्क्स तब्बल १००० अंकांनी कोसळला. इंट्रा-डे व्यवहारात सेन्सेक्सने यापूर्वीची पातळी सोडत ३५,९९३.६४ चा नवा निचांक गाठला. तर निफ्टीही ११,००० च्या खाली घसरला. दुपारी झालेल्या मोठ्या पडझडीनंतर शेअर बाजार पुन्हा सावरला. यावेळी सेन्सेक्सने पुन्हा ३६,८२५.९२ पातळी गाठली.
मोहरमच्या सुट्टीनंतर आज सकाळी शेअर बाजार तेजीतच सुरू झाला. आज सकाळी भांडवली बाजार उघडल्यानंतर गुंतवणुकदारांनी ब्ल्यू चीप कंपन्यांचे समभाग मोठ्याप्रमाणावर खरेदी केले. त्यामुळे सेन्सेक्स तब्बल ३०० अंकांनी वधारला होता. मात्र, दुपारी बाजारात अचानक मोठी पडझड झाली. त्यामुळे शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली.
या घसरणीचा सर्वाधिक फटका येस बँक, सन फार्मा, इन्फोसिस, एचयूएल, टीसीएस आणि इंडिया बुल्स हाऊसिंगच्या समभागांना बसला.