दाऊदच्या भावाला पोलिसांनी बहिणीच्या घरातून असं उचललं.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या नावानं त्याचा भाऊ इक्बाल कासकर ठाणे, कल्याण, वाशी, उल्हास नगर भागातल्या बिल्डर्सकडून खंडणी वसूल करत असे. ठाणे पोलिसांनी याविरोधात ठोस पुरावे गोळा करून इक्बाल आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.
मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या नावानं त्याचा भाऊ इक्बाल कासकर ठाणे, कल्याण, वाशी, उल्हास नगर भागातल्या बिल्डर्सकडून खंडणी वसूल करत असे. ठाणे पोलिसांनी याविरोधात ठोस पुरावे गोळा करून इक्बाल आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.
इक्बाल कासकरला जेव्हा अटक केली तेव्हा तो त्याची बहिण हसिना पारकरच्या मालकीच्या घरात बिर्याणी खात होता. काल रात्री साडे नऊच्या सुमारास इक्बालला ताब्यात घेण्यात आलं. इक्बाल आणि त्याचे साथीदार बांधकाम व्यावसायिकांकडून केवळ पैसेच नाही, तर फ्लॅटसुद्धा खंडणीच्या रुपात वसूल करत असतं. अशाच एका फ्लॅटमधून इक्बालच्या एका साथीदाराला ताब्यात घेतल्याचं ठाण्याचे पोलीस आयुक्त परमजीत सिंहांनी सांगितलं.
इक्बाल आणि त्याचे साथीदार चालवत असलेल्या रॅकेटविरोधात ठोस पुरावे असून या सर्वांवर मोक्का लावता येईल का यासंदर्भात सध्या चाचपणी सुरू आहे.