मुंबईवर पुन्हा हल्ला करण्याचा दाऊद करतोय प्लॅन
१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम २४ वर्षांनी पुन्हा तसाच हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : १९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम २४ वर्षांनी पुन्हा तसाच हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
मुंबई पोलिसांनी पाकिस्तानात राहत असलेल्या दाऊद इब्राहिम आणि भारतातील त्याच्या माणसांचा संवाद इंटरसेप्ट केलाय. दाऊदच्या या तयारीची माहिती केंद्र सरकारलाही देण्यात आली आहे.
टाईम्स नाऊने हा धक्कादायक खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार, डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीतील काही लोक हे त्याचा प्लॅन पूर्णत्वास नेण्याची तयारी करीत आहेत. अशात दाऊदचा भाऊ आणि भारतातील त्याच्या माणसांसोबत त्याचं झालेलं बोलणं इंटरसेप्ट केल्याने एक मोठा खुलासा झाला आहे. त्यांच्या संवादामधून मुंबई पोलिसांनी मोठी माहिती हाती लागल्याचे बोलले जात आहे.
रिपोर्टनुसार, दाऊद आणि त्याचे हस्तक मुंबईत हल्ल्यासारखी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. आता पोलिस आणि केंद्रीय एजन्सी दाऊदला या कामात मदत करत असलेल्या लोकांच्या शोधात आहेत.