मुंबई : नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारने पुन्हा एकदा पॅनकार्ड आधारसोबत लिंक (Pan-Aadhaar linking) करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी याबाबतची माहिती दिली. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठीच्या मुदतीत 3 महिन्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही मुदतवाढ 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.  सध्या याची अंतिम मुदत ही 30 जूनपर्यंत होती. त्याशिवाय, विवाद से विश्वास योजनेंतर्गत ( Vivad se Vishwas Scheme) व्याजाशिवाय देय देण्याच्या अंतिम मुदतीतही 2 महिन्यांनी वाढ करण्यात आली आहे. सध्या, त्याची अंतिम मुदत ही 30 जून होती, ज्यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Deadline for linking PAN card to Aadhaar has been extended from 30th June to 30th September 2021)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय करदात्यांसाठीही अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या कामांची मुदत 15 दिवसांवरून 2 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. टीडीएस निवेदन (Tds Statements) सादर करण्याच्या मुदतीत 15 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. सध्याची अंतिम मुदत 30 जून होती जी 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. कर कपात प्रमाणपत्रांची (Tax deduction certificates) मुदत 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.


संबंधित बातम्या :


Bank Alert ! जुलै महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद, त्याआधी कामे करुन घ्या...


सावधान! आधारच्या मदतीने पैशांचे व्यवहार करत असाल, तर हे कधीच करु नका


PF Account | पीएफ खात्यातील पेन्शनची रक्कम कशी काढायची? जाणून घ्या प्रक्रिया