मुंबई : भायखळामधल्या महिला कारागृहात कैद्यांचा हंगामा झाला.  जेलरनी मारल्यामुळे महिला कैद्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सध्या कारागृहात जादा कुमक तैनात करण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या भायखळा महिला जेलमधल्या कैद्यांनी जेल प्रशासनाविरोधात मोठा हंगामा केला. शुक्रवारी रात्री मंजू शेट्ये या महिला कैद्याचा जेजे रूग्णालयात मृत्यू झाल्यानंतर, भायखळा महिला जेलमधील परिस्थिती सकाळपासून नियंत्रणाबाहेर गेली. 


जेलमधील पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच या महिला कैद्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, जेलमधील सर्व महिला कैद्यांनी दंगा करण्यास सुरूवात केली. 


यावेळी महिला कैद्यांच्या मारहाणीत दोन पोलीस जखमी झाले. महिला कैद्यांनी जेलच्या छतावर चढून कागदपत्रांची जाळपोळही केली. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.