कर्जमाफीचा लाभ पतसंस्थांमधील थकबाकीदार शेतकऱ्यांना नाही
सरकारने जाहीर केलेल्या दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ पथसंस्थांमधील थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळणार नाही, सहकार विभागातल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यामुळे कर्जमाफीबाबत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : सरकारने जाहीर केलेल्या दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ पथसंस्थांमधील थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळणार नाही, सहकार विभागातल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यामुळे कर्जमाफीबाबत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँका, राष्ट्रीय बँका, ग्रामीण बँका, व्यापारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार असल्याचं समजतं आहे. सरकारच्या परिपत्रकानुसार कर्ज दिल्यानं माफी मिळावी अशी मागणी आता पतसंस्था फेडरेशननं केली आहे. २००६ साली पतसंस्थांनी एकूण कर्जाच्या २० टक्के कृषी कर्ज द्यावं, असे सरकारनं दिलं होते.