मुंबई : ड्रग्ज कनेक्श्नमध्ये बॉलिवूडमधील अनेक तारका असल्याचे पुढे येत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची चौकशी सुरु आहे. एनसीबीने दीपिकाचा मोबाईल जप्त केला आहे. एनसीबीच्या चौकशीत दीपिका पदुकोणने मोठी कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१७ चे 'ते ' व्हॉट्सअ‍ॅप चॅट झाले होते अशी कबुली दीपिकाने आपल्या चौकशीत दिल्याची माहिती समोर येत आहे. जया साहा, करिष्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांच्या ग्रुपचे आपण अॅडमिन आहोत हेही तिने कबूल केले आहे. मात्र आपण ड्रग्जचे कधीही सेवन केले नाही, असे दीपिकाने म्हटल्याचंही समोर येत आहे.



एनसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये दीपिका पदुकोणची कसून चौकशी सुरू आहे. दीपिका पदुकोण प्रश्नांची उत्तर योग्य पद्धतीने देत नाही, अशी माहिती समोर येत आहे. अनेक प्रश्नांवर दीपिका गोलमाल उत्तरे देत आहे अशीही सूत्रांची माहिती आहे. 


महिला एनसीबी अधिकारी आणि पोलीस अधिकारी दीपिकाला कठोरपणे प्रश्न विचारत आहेत, असे समजते आहे. दीपिका आणि करिष्मा यांची आमनेसामने बसवून चौकशी केली जात आहे. चौकशीसाठी दीपिका आणि करिष्मा संपूर्ण तयारीनिशी बसल्याचा एनसीबीचा अंदाज आहे.