Indian Wrestler Protest : भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधातला लढा आता अधिक तीव्र केला आहे. ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आतापर्यंत जिंकलेली सर्व पदकं गंगा नदीत (Ganga River) विसर्जित करण्याचा इशारा कुस्तीपटूंनी दिला आहे. 30 मे रोजी बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक (Sakshee Malik) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) यांच्यासहित काही कुस्तीपटू पदकं विसर्जित करण्यासाठी हरिद्वार इथं दाखल झाले. ऑलिम्पिक आणि आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिंकलेली सर्व पदकं हे खेळाडू घेऊन आले.  शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी या खेळाडूंची समजूत काढली आणि अखेर पाच दिवसांसाठी हा प्लान पुढे ढकलण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साक्षी मलिकने लिहिली पोस्ट
गंगा किनारी दाखल झाल्या नंतर साक्षी मलिकने एक पोस्ट लिहित ती सोशल मीडियावर शेअर केली आहे. पदकं आमचा जीव आहे, आमचा आत्मा आहे, ही पदकं गंगा नदीत विसर्जित केल्यानंतर आमच्या जगण्याला काही अर्थ राहात नाही. त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसणार आहे असं साक्षीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. साक्षीची ही पोस्ट विनेश फोगाटनेही शेअर केली. 


पोलिसांकडून धरपकड
त्याआधी रविवारी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या खेळाडूंची पोलिसांनी धरपकड केली. गेल्या महिन्याभरापासून हे खेळाडू दिल्लीतल्या जंतर-मंतर या ठिकाणी भाजप नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलनाला बसले आहेत. अल्पवयीन मुलीसह काही महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप या कुस्तीपटूने केला आहे. याप्रकरणी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन एफआयआरही दाखल करण्यात आले आहेत. 


कोणत्या कुस्तीपटूकडे किती मेडल्स?
दरम्यान, आंदोलनाला बसलेले बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू आहे. क्रीडा क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसह या कुस्तीपटूंनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. 


1 - बजरंग पूनिया
टोकियो ऑलिम्पिक 2020 (65 किलो) : ब्राँझ मेडल


वर्ल्ड चॅम्पियनशिप
- बुडापेस्ट 2013 (60 किलो) : ब्राँझ मेडल
- बुडापेस्ट 2018 (65 किलो) : सिल्वर मेडल
- नूर-सुल्तान 2019 (65 किलो): ब्राँझ मेडल
- बेलग्राद 2022 (65 किलो): ब्राँझ मेडल


एशियन गेम्स
- इंचेयॉन 2014 (61 किलो): सिल्वर मेडल
- जकार्ता 2018 (65 किलो): गोल्ड मेडल


कॉमनवेल्थ गेम्स
- गोल्ड कोस्ट 2018 (65 किलो): गोल्ड मेडल
- बर्मिंगहॅम 2022 (65 किलो): गोल्ड मेडल
- ग्लास्गो 2014 (61 किलो): सिल्वर मेडल


एशियन चॅम्पियनशिप
- नवी दिल्ली 2017 (65 किलो): गोल्ड मेडल
- शियान 2019 (65 किलो): गोल्ड मेडल
- अस्ताना 2014 (61 किलो): सिल्वर मेडल
- नवी दिल्ली 2020 (65 किलो): सिल्वर मेडल
- अल्माटी 2021 (65 किलो): सिल्वर मेडल 
- उलानबटार 2022 (65 किलो): सिल्वर मेडल
- नवी  दिल्ली 2013 (60 किलो): ब्राँझ मेडल
- बिशेक 2018 (65 किलो): ब्राँझ मेडल


कॉमनवेल्थ चैम्पियनशिप
- ब्राकपेन 2017 (65 किलो): गोल्ड मेडल
- सिंगापूर 2016 (65 किलो): गोल्डमेडल


2 - साक्षी मलिक
- रियो ओलम्पिक 2016 (58 किलो): ब्राँझ मेडल


कॉमनवेल्थ गेम्स
- बर्मिंगहॅम 2022 (62 किलो): गोल्ड मेडल
- ग्लास्गो 2014 (58 किलो): सिल्वर मेडल
- गोल्ड कोस्ट 2018 (62 किलो): ब्राँझ मेडल


एशियन चॅम्पियनशिप
- दोहा 2015 (60 किलो): ब्राँझ मेडल
- नवी दिल्ली 2017 (60 किलो): सिल्वर मेडल
- बिशेक 2018 (62 किलो): ब्राँझ मेडल
- शियान 2019 (62 किलो): ब्राँझ मेडल


कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप
- जोहान्सबर्ग 2013 (63 किलो): ब्राँझ मेडल
- जोहान्सबर्ग 2016 (62 किलो): गोल्ड मेडल


3 - विनेश फोगाट
वर्ल्ड चॅम्पियनशिप
- बेलग्राद 2022 (53 किलो): ब्राँझ मेडल
- नूर-सुल्तान 2019 (53 किलो): ब्राँझ मेडल
- जकार्ता 2018 (50 किलो): गोल्ड मेडल
- इंचियान 2014 (48 किलो): ब्राँझ मेडल


कॉमनवेल्थ गेम्स
- ग्लास्गो 2014 (48 किलो): गोल्ड मेडल
- गोल्ड कोस्ट 2018 (50 किलो): गोल्ड मेडल
- बर्मिंगहॅम 2022 (53 किलो): गोल्ड मेडल


एशियन चॅम्पियनशिप
- अल्माटी 2021 (53 किलो): गोल्ड मेडल
- दोहा 2015 (48 किलो): सिल्वरमेडल
- नवी दिल्ली 2017 (55 किलो): सिल्वर मेडल
- बिशेक 2018 (50 किलो): सिल्वर मेडल
- नवी दिल्ली 2013 (51 किलो): ब्राँझ मेडल
- बँकॉक 2016 (53 किलो): ब्राँझ मेडल
- शियान 2019 (53 किलो): ब्राँझ मेडल
- नवी दिल्ली 2020 (53 किलो): ब्राँझ मेडल


या पुरस्काराने सन्मानित


- बजरंग पूनिया : 2019 मध्ये पद्मश्री आणि खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार


- साक्षी मलिक : 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, त्याआधी 2016 मध्ये खेलरत्न पुरस्कारने गौरव


- विनेश फोगाट : 2020 मध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, त्याआधी 2016 मध्ये अर्जुन पुरस्कार