सुस्मिता भदाणे, मुंबई : मराठी सणासुदीला किंवा गणेशोत्सवात तुम्ही ढोल-ताशांचा गजर ऐकला असेल, पण आता निवडणुकीतही ढोल-ताशांचा वापर उमेदवारांकडून होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुक प्रचारात ढोल-ताशे निनादत आहेत. उमेदवारांना प्रचार आणि शक्तिप्रदर्शनासाठी ढोल-ताशांचं पथक प्रभावीपणे भूमिका पार पाडत असल्याचं चित्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी गणेशोत्सव, नवरात्र, गुढीपाडवा सणाला शोभायात्रेत ढोल-ताशांचा आवाज निनादत असे. पण आता लोकशाहीच्या उत्सवातही या कला पथकांना आमंत्रण मिळत आहे. यातून तरुणांना पैसेही मिळत आहेत. उमेदवाराच्या प्रचारफेरीत या ढोल-ताशा पथकांचा पेहराव अनोखा असतो. प्रचार फेरीत किती तास ढोल वाजवायचा यावर पथकाची सुपारी ठरते.


एका दिवसात साधारण ५० हजार ते १ लाखांपर्यंतच मानधन ढोल ताशा पथकाला मिळतं. यात पथकाचा विशेष पेहराव, पथकासोबतचा ध्वज याचा देखील समावेश असतो. अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकीच्या आखाड्यात ढोल ताशा पथकात सहभागी झाले आहेत. रोजगार मिळत असल्यानं युवा वर्गही आनंदीत आहे.