ब्राम्हण समाजाला आरक्षण हवे, अन्यथा तीव्र आंदोलन
`समस्त ब्राम्हण समाज महाराष्ट्र` या घोषणेअंतर्गत आझाद मैदान इथे ब्राम्हण समाजाकडून आंदोलन करण्यात आले.
मुंबई : 'समस्त ब्राम्हण समाज महाराष्ट्र' या घोषणेअंतर्गत आझाद मैदान इथे ब्राम्हण समाजाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी ब्राम्हण समाजाला आरक्षण, ब्राम्हण आर्थिक मागास गटासाठी शैक्षणिक आरक्षण मिळावे, पूरोहीतांना मानधन तसेच विविध मंदिरांमध्ये नियुक्ती करण्यात यावी, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या मागण्यांचे पत्र आंदोलकांच्या शिष्ठमंडळाकडून सरकारला देण्यात आले. वेळीच या मागण्यांचा विचार केला गेला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात राज्यभरातून ब्राम्हण विद्यार्थी सहभागी झाले होते.