मुंबई : मुंबईतील देवनारवासीय आता अखेर मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत. देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव शिवसेनेनं मंजूर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्याबाबतच्या प्रस्तावात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेनेनं केला होता. मात्र बुधवारी दोन वर्षांनी हा प्रस्ताव पुन्हा स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला असता विरोधकांना बोलू न देता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 


मुलुंडप्रमाणेच आता देवनार डम्पिंग ग्राऊंड बंगद केलं जाणार आहेत. ज्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात जवळपास ६०० मेट्रीक टन इतक्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी कोट्यवधींचा खर्च येणार आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळापूर्वीच स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. ज्याला भाजपनं विरोध दर्शवला होता. पुढं लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळं अखेर या रखडलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. 


 


न्यायालयानंही देवनारमध्ये कचरा टाकणं बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या पार्श्वभूमीवर आता हे डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठीची पावलं उचलली जात आहेत.