देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट, फडणवीस आज पुन्हा दिल्लीला जाणार?
महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात आता भाजपही अॅक्शनमोडमध्ये
Maharashtra Politial Crisis : राज्यातला सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असे शिवसेनेत (ShivSena) दोन गट पडले आहेत. सत्ता वाचवण्यासाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कंबर कसली आहे. तर दुसरीकडे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
शुक्रवारी मध्यरात्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्या भेटीत गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) सुद्धा सहभागी होत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याच भेटीसाठी देवेंद्र फडणवीस मुंबईतून तर एकनाथ शिंदे मध्यरात्री गुवाहाटीतून आले होते. भाजपसोबत आल्यास सत्तास्थापनेचा फॉर्म्युला कसा असणार याबाबत चर्चा करताना यापुढं कायदेशीर बाजू कशी मांडायची...? याबाबत भेटीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
ही भेट शुक्रवारी रात्री बडोद्यात झाल्याचं बोललं जातंय. या भेटीमुळं आता सत्तास्थापनेसाठी भाजपच्या गोटातून हालचालींना वेग आल्याचं दिसून येतंय.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत देवेंद्र फडणवीस अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती असून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात चेक-मेटचा खेळ सुरू आहे. एकीकडे उद्धव ठाकरे बैठकांवर बैठका घेत आहेत. दुसरीकडे भाजपही सक्रिय झालाय. आसाममध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत असलेले एकनाथ शिंदे यांनी 38 आमदारांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. त्यांच्या एका समर्थक आमदारानेही नवी शिवसेना स्थापन करण्याचा दावा केला आहे.