Political News : उद्धव ठाकरेंसोबत एक मंथरा आहे, (Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray) त्यामुळेच उद्धव ठाकरे रामाला नाकारणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तर अयोध्येत आम्ही ज्यावेळी लाठ्याकाठ्या खात होतो, तेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत होते, असा टोलाही त्यांनी लगावला. रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाण्यात कारसेवकांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. 


काय म्हणाले फडणवीस? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभू श्रीराम यांना ज्यांनी नाकारलं हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच खरे वाघ होते. पण, उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत मात्र कोणीही वाघ नाहीत अशा शब्दांत त्यांनी टीका केली. राम काय खातो यापेक्षा तुम्ही काय खाताय हे आता लक्षात आलं आहे, असं म्हणत काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्यामुळं अनेकांच्या रोषाचे धनी झालेल्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही त्यांनी टीकेची झोड उठवली. 


हेसुद्धा वाचा : 'मातोश्री'बाहेर घातपाताचा कट? गुजरातवरुन 4 ते 5 जण..; राऊत म्हणाले, 'ठाकरेंच्या सुरक्षेची..'


 


कारसेवक ही माझी दुसरी ओळख 


रामकथा कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधत असताना देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री अशी आपली ओळख असली तरीही दुसरा आणि त्याहूनही महत्त्वाचा परिचय म्हणजे रामसेवक आणि कारसेवक हाच आहे असं त्यांनी यावेळी वजनदार स्वरात म्हटलं. यावेळी वयाच्या 20 व्या वर्षी आपल्याला रामाची सेवा करण्याची संधी मिळाली, असं म्हणताना मी जेव्हा कार सेवेसाठी गेलो तेव्हा तुम्ही मात्र निसर्गाची फोटोग्राफी करत होतात अशी खोचक टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.