`राज्यात कायद्याचं नाही तर काय ते द्याचं राज्य` देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका
राज्यातील सर्वात भ्रष्ट सरकार असून प्रत्येक विभागात एक वाझे
मुंबई : सरकारचे अस्तित्व दिसत नाही, प्रत्येकजण स्वतः सीएम समजत पण जनतेच्या समस्याकडे पाहायला कोणी नाही, पाच वर्ष भाजपच्या सरकारमध्ये
समृद्धी महामार्ग, विकासकाम यावर चर्चा होत होती. पण या सरकारमध्ये हर्बल तंबाखू, गुन्हेगार, भ्रष्टाचार यावर चर्चा होत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्यातील आताचं भ्रष्ट सरकार
राज्यातील आताच सर्वात भ्रष्ट सरकार असून प्रत्येक विभागात एक वाझे आहे, आम्हाला काय मिळणार याचाच या सरकारमध्ये विचार होत असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे. राज्यात सध्या कायद्याचं राज्य नाही तर काय ते द्या या पद्धतीने राज्य चालतं. राज्यात नुसती वाटमारी चालली आहे, शेतकऱ्यांकडे बघायला कुणी तयार नाही, राजकारणाचं गुन्हेगारीकरण चाललं आहे असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
सरकारच्या विरोधात एल्गार
आयटी छाप्यात 500 कोटींची दलाली उघड झाली शेतकऱ्यांकडे मात्र पाहायला कोणी नाही, हे निर्लज्ज सरकार आहे, आता सरकारच्या विरोधात एल्गार पुकारावा लागेल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
कोरोना कारण सांगून आंदोलन करून देत नव्हते केसेस टाकत होते, देशद्रोह समवेत पाटर्नशीप केली जाते, अवैध दारू वाळू नक्सेस उघड होत आहे
पोलिस अहवाल बदल्या याबाबत सीबीआयकडे अहवाल आहे, कोट्यावधी रूपये देऊन पोस्टींग देतात असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ईमानी आणि बेईमानी ही नाही
लढाई समोरून लढवी लागते, आम्हाला कोणास घाबरायचे कारण नाही कारण आमच्या ईमानी आणि बेईमानी ही नाही, हे भ्रष्ट लोक त्यांच्याशी थेट लढाई लढावी लागेल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्रिपद सोडलं, 5 वर्षांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडलो, त्यानंतर मुंबईत घर नव्हतं, 4 महिने भाड्याने घर घेऊन राहिलो, विरोधी पक्षनेत्याचं निवासस्थान मिळेपर्यंत भाड्याच्या खोलीत राहिलो, असं प्रत्युत्र देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांना दिलं.
आम्ही हल्ले करणारे नाही, पण सरकार चुप बसत असेल तर उत्तर देऊ, येत्या काळात आवाज बुलंद झाला पाहिजे असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.