मुंबई : राज्याच्या विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंबई येथील CSMT रेल्वे स्थानकावर ज्या पेटीवर ९० च्या दशकात भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथराव मुंडे बसत असत त्याच पेटीवर प्रवासासाठी निघालेल्या धनंजय मुंडे यांना स्थानकावरील हमाल मंडळीनी बसण्याचा आग्रह केला असता धनंजय मुंडे त्याच पेटीवर बसून येथील हमाल मंडळींशी मनमोकळ्या गप्पा केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनंजय मुंडे यांनी CSMT स्थानकावरील जवळपास सर्वच हमाल मंडळींना व अन्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, सर्वांना आपल्या शासकीय निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिले. गुरुवारी धनंजय मुंडे हे लातूर-बीड जिल्हा दौऱ्यासाठी CSMT रेल्वे स्थानाकावरुन मुंबई - लातूर एक्सप्रेस रेल्वेने प्रवासासाठी निघाले होते. 



रेल्वेच्या निघायच्या काही मिनीटे आधी ते सीएसटी स्थानकावर आले असता, येथील हमाल मंडळींनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना गोपीनाथराव मुंडे विरोधीपक्षनेते पदी असताना वेटिंग रूममधील ज्या पेटी वर बसायचे त्याच पेटीवर बसण्याचा आग्रह केला. धनंजय मुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या पेटीवर बसून सर्व हमाल मंडळींशी संवाद साधत त्यांना दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेकांना त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही.