मुंबई : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद दिघे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नव्य़ा पीढीत देखील त्यांच्याबाबत प्रचंड उत्सूकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद दिघे यांचा 2001 साली अपघात झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण नंतर हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं होतं. आनंद दिघे यांच्या निधनाची बातमी पुढे येताच शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरली. आनंद दिघे यांच्या समर्थकांनी यानंतर सिंघानिया हॉस्पिटल पेटवून दिलं होतं. 


आनंद दिघे हे नाव त्याकाळात प्रचंड चर्चेत होतं. पण एका हत्या प्रकरणात आनंद दिघे यांचं नाव आल्यानंतर त्यांना अटक झाली होती. इतकंच नाही तर त्यांच्यावर टाडा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या झाली. ठाणे महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा 1 मताने पराभव झाला. सगळं नियोजन असताना ही मते फुटली कशी? बाळासाहेब ठाकरे यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचा कोणता नगरसेवक फूटला हे कोणाला ही कळत नव्हतं. पण त्यानंतर २१ एप्रिल १९८९ रोजी नगरसेवक श्रीधर खोपकर यांची तलवारीने वार करून हत्या झाली. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी करणारा तो नगरसेवक खोपकर हेच होते का अशी चर्चा सुरु झाली. त्यानंतर शिवसेनेमध्ये एकद खळबळ उडाली. शिवसेनेत गद्दारी करणाऱ्यांना माफी नाही. अशी चर्चा होऊ लागली.  


खोपकर यांच्या हत्या प्रकरणात आनंद दिघे यांच्यासह ५२ नगरसेवकांना अटक करण्यात आली. दिघे यांना अटक होताच ठाणे बंद झालं. खोपकर यांच्या अंत्ययात्रेला एकाही शिवसैनिकाने हजेरी लावली नाही. हे प्रकरण दिघे यांच्या मृत्यूपर्यंत कोर्टात सुरु होतं.