लोकल बफरला धडकलेल्या मोटरमनचा ह्र्द्यविकाराने मृत्यू
सीएसएमटी स्थानकात लोकल बफरला धडकलेल्या मोटरमनचा ह्र्द्यविकाराने आज सकाळी मृत्यू झाला आहे.
मुंबई : सीएसएमटी स्थानकात लोकल बफरला धडकलेल्या मोटरमनचा ह्र्द्यविकाराने आज सकाळी मृत्यू झाला आहे. २६ एप्रिल २०१९ रोजी हार्बर मार्गावरील बेलापूरहुन आलेली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाट क्रमांक १ वरील बफरला जाऊन धडकली. लोकलचा वेग कमी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र या प्रकारामुळे मोटरमन लोकेश यांची रेल्वे प्रशानाकडून चौकशी करण्यात आली आणि त्यांना सहा दिवसांसाठी प्रशिक्षणासाठी पाठ्वण्यात आले.
मात्र या घटनेला आठवडा देखील झाला नाही. त्यातच गुरुवारी सकाळी लोकेश इंदोरा यांचा ह्र्द्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मूळचे जयपूरचे असणारे लोकेश इंदोरा हे जेटीबीनगर येथे रेल्वे वसाहतीमध्ये राहत होते. २६ एप्रिल रोजी अचानक दुपारी १२ वाजता फलाट क्रमांक एकवर लोकल ट्रेन बफरला धडकल्याने जोराचा आवाज झाला होता. यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
दरम्यान, मोटरमनने तातडीने ब्रेक दाबल्याने बसलेल्या झटक्यामुळे लोकलच्या डब्यांना हादरा बसला. मात्र सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. या घटनेनंतर मोटरमनची चौकशी करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली होती. दरम्यान गुरुतेग बहादूरनगर येथील रेल्वे वसहती ते एकटेच राहत होते. लोकेश यांना या घटनेनंतर गेली ६ दिवस प्रशिक्षणासाठी पाठ्वण्यात आले. लोकेश इंदोरा यांचे कुटुंब बाहेरगावी असल्याने ते मुंबईत एकटेच वास्तव्यास होते.