मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार असल्याचं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं विधान केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''मी दोन्ही गटांमध्ये चर्चा केली. या चर्चेनंतर मला जाणवलं ते मी ट्वीट करुन लिहिलं आहे. उद्धव ठाकरे कुटुंब प्रमुख आहेत. तुटलेलं घर पुन्हा एकत्र यावं असं मला मनापासून वाटतं. दोन्ही गटांमध्ये मध्यस्ती करण्याचा प्रयत्न करत असून लवकर यश मिळेल अशी आशा आहे. ''


''माझ्यावर कारवाईचा बडगा उचलण्याचा कोणताही संबंध येत नाही. उद्धव ठाकरे मोठे आहेत. ते काहीही करू शकतात. शिंदे आणि ठाकरे गट दोन्ही एकत्रही येऊ शकतात. शिवसेनेत दोन गट नकोत अशी प्रतिक्रिया दिपाली सय्यर यांनी दिली.'' 



''सगळ्या आमदारांना माझं आवाहन आहे की शिवसेनेत दोन गट नकोत. त्यामुळे कार्यकर्ते होरपळत आहेत. मला दोन्ही गटांमध्ये बोलून हे जाणवलं आहे की त्यांना एकत्र यायचं आहे. पण कुणी समोर येऊन बोलत नाही. मान अपमान यामध्ये अडकले आहेत. मात्र तो विचार सोडून एकत्र यायला हवं असं दिपाली सय्यद बोलताना म्हणाल्या.'' 


दिपाली सय्यद यांचं ट्वीट काय होतं? 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार असल्याचं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलंय. दोन दिवसांत दोन्ही नेत्यामध्ये भेट होईल असा उल्लेख त्यांनी ट्विटरमध्ये केलं. या भेटीसाठी भाजप नेत्यांनी मध्यस्थी केल्याबद्दल त्यांनी भाजपचे आभारही मानले.