वीजबिल प्रश्नावर राज्यपालांशी चर्चा - राज ठाकरे
कोरोना काळात लोकांचे हाल झाले आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कुंथत कुंथत चालत नाही. सरकारचे धरसोड धोरण योग्य नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
मुंबई : कोरोना काळात लोकांचे हाल झाले आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कुंथत कुंथत चालत नाही. सरकारचे धरसोड धोरण योग्य नाही. लोकांचे प्रश्न सुटत नाही. मग सरकारचा काय उपयोग. विजबिलाबाबतचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. कोरोनाच्या काळात भरमसाठ वीज बिले आली होती. ती अद्याप कमी झालेली नाहीत. याबाबत पहिले एक निवेदन दिले आहे, असे सांगत राज्य सरकारला इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी ते बोलत होती.
राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. मात्र, ही भेट कशाबद्दल आहे. ते सांगितले नव्हते. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज्य ठाकरे यांनी लोकांचे अनेक प्रश्न असल्याचे बोलून दाखविले. आज रेल्वे सगळ्यांसाठी सुरु नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकांचे प्रश्न सुटलेले नाही. वीज बिलाचा प्रश्न कायम आहे. लोकांची बिले कमी झालेली नाहीत. हे सरकार कुंथत कुंथत चालत आहे. सरकारचे धरसोड धोरण आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत अनेक प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी राज ठाकरे वाढीव वीज बिलासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. लॉकडाऊनच्या काळात आपली व्यथा मांडण्यासाठी अनेक संघटनांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यातील अनेक मुद्दे राज ठाकरे राज्यपालांसमोर मांडले. त्याबाबत एक निवेदनही राज ठाकरे यांनी दिले आहे. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव अमित ठाकरेदेखील उपस्थित होते.
शरद पवार, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
वाढीव वीजबिलांसंदर्भात राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. एमईआरसी आणि वीज कंपन्या एकमेकांवर बिलांची जबाबदारी ढकलत आहेत. त्यामुळे आता सरकारने तोडगा काढावा, असे आवाहन राज यांनी केले. या संदर्भात शरद पवार यांची भेट घेणार आहोत. गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. कुंथत कुंथत सरकार चालत नाही. विषय खूप आहेत पण राज्य सरकारने निर्णय तर घ्यायला पाहिजेत नाही. धरसोड धोरण कशासाठी, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.