मंत्रिमंडळ बैठकीत वाद, काँग्रेस-शिवसेनेचे मंत्री गृहमंत्री वळसे-पाटलांवर नाराज
महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली.
मुंबई : महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पण याच कॅबिनेट बैठकीत वाद झाल्याची माहिती देखील पुढे येत आहे. काँग्रेस आणि शिवसेना मंत्र्यांनी वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावर नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती पुढे आली आहे.
अस्लम शेख (Aslam Shaikh) आणि वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्यावर तलवार हातात घेतली म्हणून गुन्हे थेट दाखल केले गेले होते. याच मु्द्द्यावर काँग्रेसचे नेते आणि मंत्री अस्लम शेख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अस्लम शेख यांच्यासह काही मंत्र्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.
सरकार आपले तरी मुंबई पोलीस आपल्यास मंत्र्यांवर गुन्हे दाखल करतात. असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला आहे. मुख्य सचिव यांची समिती याबाबत आता अहवाल मागवणार आहे. गुन्हे दाखल कोणत्या कारणांमुळे केले यांची माहिती घेतली जाणार आहे.