मुंबई : राज्य सरकारच्या गृहनिर्माण महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयावर शिवसेना मंत्री दिवाकर रावते यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच नाराजी व्यक्त केली. तर निवडणुकीच्या तोंडावर सरकारी गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. 


परवडणाऱ्या घरांची योजना राबवण्यासाठी म्हाडा, एसआरएला मर्यादा  पडत असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या महामंडळांच्या अध्यक्षांचेही अधिकार कमी होणार आहेत. विशेष म्हणजे या महामंडळावर अशासकीय सदस्याचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे मंत्र्यांपेक्षा अशासकीय सदस्याला अधिकार मिळणार आहेत.