मुंबई : दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेतर्फे आयोजित दीपोत्सवात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मराठी अभिनेते, अभिनेत्रींनी हजेरी लावली.


शिवाजी पार्कामध्ये गेल्यावर्षीपासून मनसेकडून विद्युत रोषणाई केली जाते. दररोज सायंकाळी या रोषणाईचं प्रज्वलन नामवंतांकडून करण्यात येत. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अभिनेता महेश मांजरेकर, संजय नार्वेकर, सचिन खेडेकर अभिनेत्री शर्वरी पिल्लई उपस्थित होते.


या रोषणाई प्रज्वलानानंतर सगळ्यांनी दादरकरांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच यंदा फटाक्यांमुळे होणारं ध्वनी आणि पर्यावरण प्रदूषणाचं प्रमाण कमी झाल्याबद्दल सर्व कलाकारांनी समाधान व्यक्त केलं.