सोनपावलांनी लक्ष्मीचे आगमन, पाहा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
दिवाळीचा सण (Diwali ) म्हटला की, उत्साह आणि आनंद. मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजेला (diwali maha laxmi puja shubh muhurat) महत्व आहे.
मुंबई : दिवाळीचा सण (Diwali ) म्हटला की, उत्साह आणि आनंद. मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. दीपोत्सवावर सध्या कोरोनाचे सावट आहे. मात्र, अनलॉक सुरु झाल्यापासून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दिवाळीत थोडासा उत्साह दिसून येत आहे. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जात आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजेला (diwali maha laxmi puja shubh muhurat) महत्व आहे. यासाठी मनोकामना केली जाते. घर असो किंवा कार्यालय असो; दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला ( laxmi puja shubh muhurat) प्रत्येक ठिकाणी मोठे महत्त्व आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. अश्विन अमावास्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. आज १४ नोव्हेंबर २०२० रोजी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. नेमके केव्हा लक्ष्मीपूजन करावे? लक्ष्मी देवीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता? ( laxmi puja shubh muhurat) सोनपावलांनी लक्ष्मीचं आगमन. घरोघऱी लक्ष्मीपूजनाची लगबग. रात्री ८.३२ पर्यंत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. आज लक्ष्मीपूजन. पहाटे चंद्रोदयकाली आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि प्रदोषकाली आश्विन अमावास्या आहे. काय आहे आजचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त, याची अनेकांना उत्सुकता असते. याबद्दल सांगतायत खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात दिवाळीत लक्ष्मीपूजन महत्वाचे आहे.
निज अश्विन अमावास्या प्रारंभ: शनिवार, १४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ०२ वाजून १८ मिनिटांनी होणार आहे. निज अश्विन अमावास्या समाप्ती रविवार, १५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांनी होणार आहे. भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली, तरी लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळी करणे शास्त्रसंमत असल्यामुळे शनिवार, १४ नोव्हेंबर २०२० रोजी ते करावे, असे सांगितले जात आहे.
मुंबई आणि परिसरात शनिवारी सायंकाळी ५ वाजून ५९ मिनिटे ते रात्रौ ८ वाजून ३२ मिनिटे हा कालावधी लक्ष्मीपूजनासाठी चांगला आहे. सायंकाळी ७ वाजून २८ मिनिटांपर्यंत वृषभ लग्न आणि रात्री ८ वाजून ९ मिनिटांपर्यंत स्वाती नक्षत्र असेल. या कालावधीत लक्ष्मी कुबेर पूजन करणे सर्वोत्तम आहे.