MARD Doctors Strike: आज संध्याकाळपासून मुंबईतील डॉक्टर संपावर जाणार आहेत. राज्यातील सरकारी मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उगारलंय. निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातील जवळपास 8000 डॉक्टर आज बेमुदत संपावर जाणार आहेत. यासंदर्भात राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना पत्रंही लिहिण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवासी डॉक्टरांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय आहे. या पत्रामध्ये डॉक्टरांनी नमूद केलं आहे की, "महाराष्ट्र राज्यातील निवासी डॉक्टरांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याबाबत केंद्रीय MARD, राज्यभरातील निवासी डॉक्टरांची प्रातिनिधिक संस्था, गांभीर्य नसल्यामुळे आम्ही अत्यंत निराश झालो आहोत."


"आमच्या मागण्या दोन दिवसांत पूर्ण केल्या जातील, असं आश्वासन देऊनही दोन आठवडे उलटूनही यामध्ये कोणतीही प्रगती दिसून झालेली दिसत नाही. आम्ही सरकारच्या बोलण्यावर विश्वास केला होता. इतकंच नाही तर यापूर्वीही अनेकदा संप पुकारला होता. निवासी डॉक्टरांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही त्यांना वेळेत योग्य ती जबाबदारी सोपवली, असंही या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.


निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून संप पुकारणार आहेत. काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत डॉक्टरांची चर्चा झाली होती. डॉक्टरांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र त्याची पूर्तता न झाल्याने गुरुवारपासून निवासी डॉक्टरांनी संप पुकारणार आहेत.


काय आहेत निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या?


  • निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेलची व्यवस्था करण्यात यावी.

  • निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.

  • निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात दहा हजारांची करण्यात आलेली वाढ लागू करण्यात यावी.