डोंबिवली स्टेशनवरही आहेत या सुविधांचा अभाव
एल्फिन्स्टनरोडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आता रेल्वे प्रशासन खडबडून जागे झालंय.
डोंबिवली : एल्फिन्स्टनरोडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आता रेल्वे प्रशासन खडबडून जागे झालंय.
23 जणांच्या मृत्यू नंतर आता सर्वच स्टेशन आणि त्यांना भेडसावणार्या समस्या आणि त्यावर काय उपाय योजना करता येतील याकडे प्रशासननानं आता बारकाईनं अभ्यास करायला सुरुवात केलीय.
सर्वात प्रमुख समस्या म्हणजे प्रचंड गर्दी. डोंबिवली रेल्वे स्थानकात तीन ब्रिज असले तरी ते अपूर्ण आहेत. कारण मधल्या मोठ्या ब्रिजचा अपवाद वगळता दोन्ही ब्रीज अरुंद आहेत.
आधीच ब्रिज अरुंद त्यात फेरीवाल्यांनी ठाण मांडलंय. अशातून मार्ग काढत प्रवाशांना स्थानकातून ये-जा करावी लागते. दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे महिलांसाठी स्वछतागृहांचा अभाव आहे. ट्रेनची वाट पाहत असणारे प्रवासी, अनधिकृत फेरीवाले यामुळे भविष्यात एलफिन्स्टनची घटना होईल का अशी भीती प्रवासी व्यक्त करतायत.