डोंबिवली : येथील खांबाळपाडा परिसरात एका भरधाव ट्रकने  तिघांना चिरडलं. या दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबल माजली आहे. मुंलांना शाळेत सोडायला जाणाऱ्या दुचाकीस्वाराने एका भरधाव ट्रेकला धडक दिली. या धडकेत आई, वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे तर मुलगा गंभीर जखमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी कल्याणहून डोबिंवलीत निघालेल्या दुचाकीचा अपघात झाला. गणेश चौधरी हे पत्नी उर्मिलाबरोबर दुचाकीवरुन आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये गणेश, उर्मिला आणि चार वर्षीय हंसिकाचा जागीच मृत्यू झाला. 



तर पाच वर्षीय देवांश थोडक्यात बचावला आहे. ट्रेकचा वेग पाहता चौधरी यांनी ट्रकसाठी रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या दुचाकीचे हॅण्डल ट्रकच्या चाकाला घासलं गेलं आणि गाडीवरील चौघांपैकी तिघेजण ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. 


तर कल्याणमध्ये झालेल्या दुसऱ्या अपघातात दुचाकीने धडक दिल्यामुळे प्रभाकर ठोके नावाच्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला आहे. प्रभाकर डीएनसी शाळेत शिक्षण म्हणून कार्यरत होते.