अमरनाथ दहशतवादी हल्ला: मृत्यूच्या दारातून `ते` परतले
जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर १० जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ८ निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. यात महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील दोन महिलांचा समावेश होता. तसेच या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते. या जखमींमध्ये पालघरमधील डोंगरे कुटुंबीयही आहेत.
मुंबई : जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर १० जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ८ निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. यात महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील दोन महिलांचा समावेश होता. तसेच या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते. या जखमींमध्ये पालघरमधील डोंगरे कुटुंबीयही आहेत.
डोंगरे यांना कमरेत तीन गोळ्या लागल्यात आणि इतर 3 गोळ्या त्यांना चाटून गेल्या. तर पत्नीला 1 गोळी लागली. त्या हल्ल्याची दहशत आजही डोंगरे कुटुंबियांमध्ये आहे. दहा दिवस उलटल्यानंतरही भीती कुटुंबियांच्या मनात घर करून आहे. उघड्या डोळ्यांनी आपला मृत्यू त्यांनी पाहिला होता. जवानांनी आम्हाला खुप सहकार्य केल्याचं त्यांनी सांगितलं. दोन दिवसांपूर्वी डोंगरे कुटुंबिय सुरतमधून उपचार घेऊन आपल्या घरी पोहचलं.