विद्यार्थ्याची जात विचारल्यास होणार कारवाई! IIT मुंबईकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
IIT Mumbai Guidelines: दर्शनने आपल्या आईला संस्थेच्या कॅम्पसमध्ये जातीय भेदभाव असल्याचे सांगितले होते. फोन कॉल दरम्यान त्याने आपल्या आईला सहकारी विद्यार्थ्यांना त्याच्या जातीबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांचे वागणे बदलले, असे सांगितले होते.
IIT Mumbai Guidelines: जाती,धर्मावरुन होणाऱ्या वादातून विद्यार्थ्यांकडून आत्महत्येसारखे टोकाची पाऊल उचलले जाते. त्यामुळे आयआयटी मुंबईने आता कठोर पाऊले ऊचलली आहेत. एकत्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एकमेकांना त्यांची रँक किंवा जात विचारू नये असे निर्देश आयआयटी मुंबईने दिले आहेत. असे कोणी केल्यास त्या विद्यार्थ्यावर कारवाई होणार आहे. आयआयटी मुंबई व्यवस्थापनाने ही मार्गदर्शक तत्वे कॅम्पसमध्ये चिकटवली आहेत. विद्यार्थी दर्शन सोळंकी याच्या आत्महत्येनंतर पाच महिन्यांनी हा निर्णय आला आहे. यावर दर्शन सोळंकी यांचे वडील रमेशभाई सोळंकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हा नियम पूर्वीही होता मात्र त्याचे पालन होत नाही. पालन झाले असते तर दर्शन आज जिवंत असता असे ते म्हणाले. दर्शनने उदय मीनाला सगळं सांगितलं होतं, तरीही त्याची खोली बदलली नव्हती. त्याचे रूम मेट दर्शनाला त्रास देत असत आणि त्याची रँक विचारल्यावरच त्याचा दृष्टीकोन बदलला ज्यामुळे त्याचे कारण काय होते हे स्पष्ट होते.
एसआयटीने उदय मीणाचे म्हणणे ऐकून घेतले पण ते आरोपपत्रात टाकले नाही. असे का केले गेले? याचे उत्तर कोणाकडे नाही. नियम फक्त सरकार आणि जनतेला दाखवायचा आहे, तो पाळला तरच भेदभाव थांबेल, असे दर्शनचे वडील म्हणाले.
विशेष म्हणजे दर्शनच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी आयआयटी व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले होते. मुलावर जातीच्या आधारावर भेदभाव केल्याचा आरोपही करण्यात आला होता, त्यानंतर एसआयटीची स्थापना करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वे
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT B) ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत ज्यात विद्यार्थ्यांनी सहकारी विद्यार्थ्यांना त्यांची जात उघड करू शकणारी माहिती विचारू नये असे आवाहन केले आहे. त्याऐवजी त्यांना क्रीडा, संगीत आणि चित्रपट यासारख्या सामान्य आवडींमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
सहकारी विद्यार्थ्यांना त्यांची जन्मतारीख, प्रवेश आणि ते कोणत्या श्रेणीशी संबंधित आहेत याबद्दल विचारणे अयोग्य आहे कारण यामुळे जाणीवपूर्वक किंवा अवचेतन पूर्वाग्रह होऊ शकतो.
रँक विचारणे म्हणजे जात जाणून घेण्याचा प्रयत्न!
इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या JEE Advanced रँक किंवा GATE स्कोअर किंवा इतर कोणत्याही माहितीबद्दल विचारणे देखील अयोग्य आहे, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
जे जात किंवा इतर संबंधित गोष्टी समजू शकतात.
रँक मागणे म्हणजे जात पडताळून पाहण्याचा आणि भेदभावाचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न वाटू शकतो.
अपमानास्पद, द्वेषपूर्ण, वर्णद्वेषी, लिंगवादी किंवा धर्म किंवा लैंगिक प्रवृत्तीवर आधारित कट्टरता प्रदर्शित करणारे विनोद करु नये. ज्याचा छळ किंवा गुंडगिरी म्हणून अर्थ लावला जाऊ शकतो.
दरवर्षी नवीन अंडर ग्रॅज्युएट (UG) आणि पोस्ट ग्रॅज्युएट (PG) विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन सत्र आयोजित केले जाते. यामध्ये, विविध संस्था/सेल, आयआयटी बॉम्बे कोणत्याही प्रकारच्या भेदभावाबाबत झिरो टॉलरन्स धोरणावर नेहमीच भर देतात.
दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण
अहमदाबाद येथील रहिवासी असलेल्या सोलंकी यांनी १२ फेब्रुवारी रोजी आयआयटीबी कॅम्पसमधील वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. त्यानुसार, दर्शनने आपल्या आईला संस्थेच्या कॅम्पसमध्ये जातीय भेदभाव असल्याचे सांगितले होते. फोन कॉल दरम्यान त्याने आपल्या आईला सहकारी विद्यार्थ्यांना त्याच्या जातीबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांचे वागणे बदलले, असे सांगितले होते.