मुंबई : कुठेही पहिले काही तरी थंड पिऊ या असे शब्द आपल्या कानी सध्या सहज पडतात. आणि हीच लोकं मग एखाद्य गाडीवर लिंबू सरबत किंवा आणखी कोणतंही सरबत पिण्यासाठी सरसावतात. परंतु या सरबतमध्ये वापरण्यात आलेले पाणी खरंच चांगल्या दर्जाचे आहे का ?याचा कोणी विचार ही करत नाही तर हे पाणी म्हणजे एक विषच आहे. असे तज्ञ् सांगतात. हे असे का म्हणतात ? याच विषयी हा झी मीडियाने घेतलेला आढावा. 


तापमान वाढलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळा सुरु झालाय परंतु तो असा तसा नाही तर थेट ४० अंश सेल्सियस पार गेलाय. यातंच मग ठाणेकर असो कि मुंबईकर थंड पाण्याचा किंवा पोटात काही तरी थंड जावे आणि गारगार वाटावे असेच त्याला वाट्ते. त्यात फिल्डवर कामकारणारे किंवा काही कामानिमित्त उन्हातही ज्यांना घरा बाहेर पडावे लागते अशा लोकांना तर कधी थंड पाणी पितो असे वाटते. कारण उन्हाच्या लाह्या वाढतच चालल्या आहेत. मग हाच तहानलेला एखाद्या लिंबू सरबत किंवा आणखी कोणत्यातरी सरबतच्या गाडीवर जाऊन त्या सरबतने आपली तहान भागवतो.


सरबत आहे धोकादायक


आज अशा सरबतच्या गाड्या शहरात शेकडो आहेत. परंतु प्रश्न हा आहे की जे सरबत आपण पितो त्यात वापरण्यात आलेले पाणी खरच शुद्ध आहे. पिण्या योग्य आहे का ?तर या एवढ्या मोठ्या गोष्टीचा आपण विचार ही करत नाही. सरबतवाला हे पाणी कुठून आणतो ? हा छोटा प्रश्न ही त्याला आपण विचारत नाही.  झी मीडियाने हाच प्रश्न त्यांना विचारलं असता तर गडबडत आम्ही घरून पाणी आणतो असं काही जण सांगतात तर काही लोकं बाजूचे काही कार्यालय आहेत तेथून आणतो अशी उत्तरे देतात. 


नागरिकांना आवाहन


लोकांनी बाहेर असे सरबत पिऊ नये कारण हे पाणी नक्कीच हानिकारक आहे ते शुद्ध अजिबात नाही. कारण आधीच उन्हळ्यात पाणी टंचाई असते. धरणाचे पाणी खाली गेले असते त्यामुळे अनेक ठिकणी गढूळ पाणी येते. त्यामुळे सरबतमध्ये वापरण्यात येणारे पाणी नक्कीच अशुद्ध असते आणि ज्या प्रमाने चहा पिताना तो चहावाला ते पाणी उकळवतो त्यामुळे हे पाणी ओपाआप शुद्ध होते. परंतु सरबतवाला असे काही करत नाही. त्या सरबतमध्ये वापरण्यात आलेला बर्फ ही त्याच प्रमाणे हानीकारक असतो. त्यामुळे घरातूनच पाण्याची बाटली, लिंबू सरबत, ताक, पेज, ग्लूकोंडीची बाटली सोबत घेऊन घरा बाहेर पडा. नाही तर काही फळे घ्यावीत. परंतु हे पाणी किंवा असे सरबत पिऊ नये. यामुळे कावीळ, टायफड,गॅसस्ट्रो ,पोटाचे आजार, जुलाब, उलट्या, फूड पॉयजनींग सारखे आजार होऊ शकतात. शक्यतो गरम पाणी किव्हा घरातील पाणीच प्यावे असा सल्ला डॉक्टर देतात. एफडीए विभागाने ही यावर कडक ठेवणे गरजेचे आहे.