Mumbai Viral Video : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मरीन लाइन्सवर तरुणाईंकडून हटके अभिवादन
Ambedkar Jayanti Viral Video : आज देशासह जगभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातं आहे. मुंबईतील (Mumabi News) चैत्यभूमी (Dadar Chaityabhoomi ) आणि नागपुरातील (Nagpur News) दीक्षा भूमी (Diksha bhumi) इथे मोठ्या प्रमाणात अनुयायी लाडक्या बाबासाहेबांना अभिवादन करत आहे. पण काही तरुणाईंनी बाबासाहेबांना हटके अभिवादन केलं.
Dr Babasaheb Ambedkar Jayanti Mumbai Viral Video : मुंबई आणि मुंबईकर यांची दुनियाचं काही और असते. मुंबईचं रुप दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मुंबईतील दुनियादारी तर कधी मरीन लाइन्सवरील एक निवांत क्षण...पण आज मुंबईतील तरुणाईंचा एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. देशभरासह जगभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्यात येतं आहे. या तरुण तरुणींनी हटके अभिवादन (#JaiBhim) केलं आहे.
हटके अभिवादन!
आज मुंबई दादरमधील चैत्यभूमी आणि नागपुरातील दीक्षा भूमीवर लाखो अनुयायींचा निळा महासागर लोटला आहे. प्रत्येक जण आपल्या परीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जागवत आहेत. घरोघरी आणि परिसरात भीम गाण्यांचा आवाज गुंजतोय. मग अशात आजची तरुण पिढी कशी मागे राहिल.
अन् मरीन लाईन्सवर थिरकली तरुणाई
मरीन लाईन्सवर सकाळीच्या वेळी व्यायाम करणारे, प्रभात फेरी, पथनाट्यापासून संगीताच्या तालावर नाचणारे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. लहान मुलांपासून तरुण तरुणींनी ''आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला'' या भीम गाण्यावर थिरकले. गायक आनंद शिंदे यांच्या गाण्यावर डान्स करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील आकाश साळवी या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखोंहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.