मुंबई : शोषित, पीडित आणि दुर्लक्षितांना जगण्याचं आत्मभान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  Dr BR Ambedkar यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त Mahaparinirvan Din 2019 मुंबईतील दादर येथे असणाऱ्या चैत्यभूमीवर हजारो भीमसैनिक दाखल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादरमधील शिवाजी पार्कवर जणू भीमसागर उसळल्याचं चित्रं पाहायला मिळत आहे.  झालं आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनानेही जय्यत तयारी केली असून शिवाजी पार्कवर सर्व सोयी -सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. ३ डिसेंबरपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भीमसैनिक चैत्यभूमीवर येऊ लागले आहेत. यंदाच्या वर्षी चैत्यभूमीवर गर्दीचा उच्चांक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.



दरम्यान, गुरुवारपासूनच शिवाजी पार्क परिसर आणि विविध ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त एका अद्वितीय व्यक्तीमत्त्वाला म्हणजे बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आंबेडकरी गायक, कलावंत भीमगीतं गाऊन आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करत आहेत. कविसंमेलनांमधूनही महामानवाला अभिवादन केलं जात आहे.


एकिकडे संपूर्ण कुटुंबासह बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करणाऱ्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे प्रशासनाकडून या प्रसंगी सर्वतोपरी सहकार्य केलं जात आहे. या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत. त्यांच्यासोबतच अनेक राजकीय नेतेमंडळीसुद्धा येथे उपस्थित राहणार आहेत.