मुंबई : विश्वाच्या निर्मीतीचा गुंता सोडण्यासाठीचा पहिला सकारात्कमक प्रयत्न करणारे ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचं निधन झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विज्ञान क्षेत्राच्या झालेल्या या मोठ्या नुकसानाबद्दल भारतीय शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथा माशेलकर यांनी दु:ख व्यक्त केलंय. डॉ. रघुनाथ माशेलकर हे सध्या कामानिमित्त पॅरीसमध्ये असून फोनवरून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.


गेल्या काही दिवसात त्यांची प्रकृती ढासळत होती. आज अखेर त्यांच्या केब्रिज विद्यापीठातल्या रहात्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अवकाशाच्या गूढ व्याप्तीपासून तर अणू रेणूंपर्यंत मानवी अस्तित्वाच्या प्रत्येक अंगाचा अतिशय सखोल अभ्यासासाठी ह़ॉकिंग सुप्रसिद्ध होते. 20 व्या आणि 21 साव्या शतकात विज्ञानाच्या नव्या कक्षा अंतराळाच्या पलिकडे नेणारा असा एक असामन्य बुद्धिमत्तेचा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला.