Drug Case : गुन्हा सिद्ध झाला तर आर्यन खानला होऊ शकते इतक्या वर्षांची शिक्षा
शनिवारी रात्री एनसीबीने केलेल्या कारवाईत एकूण 8 जणांना ताब्यात घेण्यात आल होते. ज्यामध्ये 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : आर्यन खानवर एनडीपीएसच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अंमली पदार्थाचे सेवन करणे, स्वतः जवळ बाळगणे आणि खरेदी करणे असे आरोप करण्यात आले आहेत. आर्यन खानवर जर गुन्हा सिद्ध झाला तर त्याला शिक्षा ही भोगावी लागू शकते.
एनडीपीएसच्या अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला तर त्याला 1 वर्षे सक्त मजुरी आणि 25 हजार रक्कम अशी शिक्षा होऊ शकते. शनिवारी रात्री एनसीबीने केलेल्या कारवाईत एकूण 8 जणांना ताब्यात घेण्यात आल होते. ज्यामध्ये 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकला. क्रूझवर ड्रग पार्टी आयोजित केल्याबद्दल एनसीबीला कळले, त्यानंतर वेशातंर करुन अधिकारी पार्टीत सामील झाले होते. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही या पार्टीत उपस्थित होता. आर्यन खानला एनसीबी कार्यालयात चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली आहे.
आर्यन खान आणि इतर दोन आरोपी कोर्टासाठी रवाना झाले आहेत. एनसीबीचे अधिकारी सर्वांना किल्ला न्यायालयात घेऊन जात आहेत. आर्यन आणि इतर दोघांना मागच्या दाराने न्यायालयाच्या आत नेले जाईल.