मुंबई : कसारा घाटाजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्याने या परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालाय. मुंबईकडे येणाऱ्या गाड्या ठप्प आहेत. तर काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच कसारा येथून काही गाड्या माघारी पाठविण्यात आल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस गाडीचे सात डब्बे रुळावरुन घसरल्याने वाहतुकीला अडथळा झालाय. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्यात तर वाहतूक ठप्प पडलेय. लांबपल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या आहेत. तर काही गाड्या मनमाड रेल्वे स्थानकात थांबविण्यात आल्या असून प्रवाशांचा खोळंबा झालाय.
 
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस आणि गोदावरी एक्स्प्रेस याचा समावेश आहे.  नागपूर-सेवाग्राम ही गाडी मनमाड स्थानकात दोन तासांपासून खोळंबलेय. तसेच पंचवटी आणि राज्यराणी या गाड्या कसारा येथून परत पाठविण्यात आल्यात.


 नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघातामुळे लांबपल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. रेल्वेची वाहतूक मनमाडहून दौंड मार्गे वळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुण्याला जाणाऱ्या गाड्या दोन तासांनी उशिराने धावत आहे. काही गाड्या कल्याणमार्गे वळविण्यात आल्यात.