Dussehra Melava 2022 : शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर आता दसरा मेळाव्यात (Dasara Melava) दोन्ही गट जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाने (Shinde vs Thackeray) अभूतपूर्व असं नियोजन केलंय. लाखो कार्यकर्ते जमवण्यासाठी दोन्ही गटांनी कोट्यवधींचा खर्च केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरे आणि शिंदे यांच्या भाषणाकडे लक्ष लागलं असतानाच शिंदे गटातील (Shinde Group) एका खासदारने मोठा दावा केला आहे. आजच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी केला आहे. 50 आमदार आणि 12 खासदार शिंदेंसोबत आहेत, आज आणखी दोन खासदार आणि पाच आमदार सामील होतील, शिंदेंसोबतचीच करी शिवसेना असं तुमाने यांनी म्हटलं आहे. तसंच शिंदे यांची शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातआहे, असंही तुमाने यांनी म्हटलं आहे. 


दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी
दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.  10 हजारांहून अधिक एसटी बसेस, खासगी बसेस, गाड्या बुक करण्यात आल्या आहेत. त्यातून लाखो कार्यकर्ते दोन्ही मेळाव्यांसाठी जमवले जात आहेत. मुंबईत दसऱ्याला सुट्टी असल्याने इतर वाहनांची संख्या कमी असेल असं गृहीत धरून लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रातून मुंबईत आणण्याचं नियोजन आहे. एवढी मोठी गर्दी आवरण्याचं आणि त्याचवेळी कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. (shivsena Dasara melava)


शिवाजी पार्कवर (Shivaji park) दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गट (Thackeray Group) सज्ज झालाय. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी काही लाख कार्यकर्ते जमवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतून किमान 50 हजार तर मुंबईबाहेरून 50 हजार कार्यकर्ते जमवण्याची रणनीती आखण्यात आलीये. ज्याची गर्दी जास्त त्याची शिवसेना असा प्रचार केला जातोय. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटात गर्दीची शर्यत सुरू झालीय.