Ed Summons Varsha Raut : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीचं समन्स
Ed Summons Varsha Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena Mp Sanjay Raut) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राऊत यांच्या पत्नी वर्षा (Ed Summons Varsha Raut) यांना ईडीने समन्स बजावलं आहे. या समन्सनुसार, वर्षा राऊत यांना उद्या शुक्रवारी (5 ऑगस्ट) ताबडतोब चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. सेना खासदार राऊत सध्या पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या कोठडीत आहेत. या प्रकरणातच वर्षा यांना समन्स बजावण्यात आलं आहे. (ed enforcement directorate summons to shiv sena mp sanjay raut wife varsha in patra chawl scam matter)
संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ
संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत आता सोमवार 9 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडी कोठडीत आहेत. याच प्रकरणी आता वर्षा यांची शुक्रवारी चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता राऊतांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
पत्राचाळ प्रकरणाबाबत थोडक्यात (Patra chawl land scam case)
मुंबईतील गोरेगावमध्ये ही पत्राचाळ आहे. या पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊत यांच्या मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली.
राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचं पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं. मात्र गुरु आशिष कन्सट्रक्शन कंपनीने भाडेकरुंसाठी आणि म्हाडासाठी सदनिका न बांधताच एकूण 9 विकसकांना तब्बल 901 कोटींना एफएसआय विकला.
गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रकल्प सुरु करण्यात आला. तसेच सदनिका विकण्याच्या नावाखाली 138 कोटींची माया जमा करण्यात आली.
मात्र यानंतर म्हाडाच्या अभियंत्याने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर ईडीची एन्ट्री झाली. ईडीने या प्रकरणात चौकशी सुरु झाली. ईडीला तब्बल 1039.79 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यापैकी प्रवीण राऊत यांच्या खात्यात 100 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
प्रवीण यांनी ही रक्कम आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे ट्रान्सफर केली. या 100 कोटींपैकी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी दिल्याचं समोर आलं.