मुंबई : Yes Bank चे संस्थापक आणि माजी सीईओ राणा कपूर यांच्या अटकेनंतर ईडीकडून त्यांची पत्नी आणि मुलगी रोशनी कपूर यांची तीन तास कसून चौकशी केली. 11 मार्चपर्यंत राणा कपूर यांना कोठडी मिळाली आहे. कर्जवाटप व आर्थिक गैरव्यहारप्रकरणी निर्बंध लादण्यात आलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणा कपूर यांची पत्नी आणि मुलगी रोशनी यांना रविवारी रात्री 10 वाजल्यापासून तीन तास चौकशी करण्यात आली. ईडी ऑफिसमध्ये ही चौकशी करण्यात आली. राणा कपूर यांच्यासोबत कुटुंबियांची देखील कसून चौकशी केली. मुलगी रोशनीला मुंबई एअरपोर्टवर रोखण्यात आलं. रोशनी ब्रिटीश एअरवेजमार्फत लंडनला जात होती. तेव्हाच तिला एअरपोर्टवरून ताब्यात घेण्यात आलं. 


येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना ईडीनं अटक केली असून  त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळे कोर्टानं त्यांना ११ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान कपूर यांच्या कुटुंबीयांविरोधातही लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून, त्यांची मुलगी रोशनी कपूर यांना लंडनला जाण्यापासून रोखलं आहे. दरम्यान काल रात्रीच्या सुमारास त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. 


शुक्रवारी रात्री राणा कपूर यांच्या घरावर छापा टाकला होता. यानंतर काल (रविवारी) त्यांना चौकशीसाठी 'ईडी'च्या कार्यालयात पाचारण करण्यात आले होते. तब्बल ३० तास त्यांची कसून चौकशी झाली. रविवारी पहाटेपर्यंच ही चौकशी सुरु होती. यानंतर अधिक तपासासाठी अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना अटक केली. आज सकाळी ११ वाजता 'ईडी'कडून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.



येस बँकेला अडचणीत आणणारे बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि पंजाब नॅशनल बँकेला चुना लावणारा नीरव मोदी हे दोघेही मुंबईतील समुद्र महल या उच्चभ्रू इमारतीत राहातात. त्यामुळे या दोघांमध्ये काही संबंध तर नाहीत ना, अशी शंका उपस्थित झाली आहे