छगन भुजबळांविरोधात ईडीचं पुरवणी आरोपपत्र दाखल
छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई : छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भुजबळांविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. नविन मालमत्ता आणि नविन आरोपी असल्याचा दाखला देत हे नवे प्रकरण असल्याचा ईडीचा दावा आहे. मात्र ईडीच्या दाव्याला छगन भुजबळांच्या वकिलांनी विरोध केला आहे. दरम्यान भुजबळांच्या वकिलांनी अटक पुर्व जामिनासाठी अर्ज केला असून या अर्जावर आणि ईडीच्या दाव्यावर थोड्याच वेळात निकाल येणे अपेक्षित आहे.