मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवला आहे. उदया चौकशीसाठी ईडीने बोलावले आहे. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने हा समन्स पाठवला आहे. ईडीने अनिल परब यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल परब यांना 15 जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते मात्र परब शिर्डीला असल्याने ते पोहचले नव्हते. अनिल परब यांच्या दोन निवासस्थानांसह सुमारे 7 ठिकाणी ईडीने छापा टाकला होता. 



कोस्टल रेग्युलेटरी झोन ​​(CRZ) नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या रिसॉर्टच्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला. 


आाधी महाविकासआघाडीतील 2 नेते नवाब मलिक आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाली आहे.