दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत झालेल्या खड्ड्यांना जबाबदार शिवसेना आणि भाजपा आहे. त्यामुळे त्यांना या खड्ड्यांमध्ये टाकले पाहिजे अशी टीका माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी केली. माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलींद देवरा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाकडे संजय निरुपम यांनी पाठ फिरवली. कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर संजय निरुपम यांचा फोटो होता. तरी देखील संजय निरुपम यांच्यासह त्यांच्या गटाने कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



यावेळेस एकनाथ खडसेंनी शिवसेना आणि भाजपावर चांगलाच निशाणा साधला. 'गेल्या २५ वर्षांपासून मुंबई शिवसेनेच्या ताब्यात आहे मात्र पहिल्या पावसातच मुंबईची तुंबई झाली. मुंबईत अनेक खड्डे झाले आहेत. तर शिवसेना आणि भाजपाला या खड्ड्यांमध्ये टाकले पाहिजे. बाहेरच्या लोकांना आपल्या पक्षात यायचं आहे. त्यामुळे आपसातील मतभेद, हेवेदावे बाजूला सारणे सर्वांसाठी फायद्याचे आहे. ' 


'मी पराभवाची जबाबदारी स्वीकारून मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माझा राजीनामा स्वीकारावा अशी विनंती केली होती. मात्र पक्षाने माझा राजीनामा स्वीकारला नाही. त्यानंतर मी एक कार्याध्यक्ष नियुक्त करण्याची पक्षाला विनंती केली त्यानुसार पक्षाने एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती केल्याचे ते म्हणाले. जे मतभेद, गटबाजी असेल ती दूर करा, असे मी अध्यक्ष झालो तेव्हाच जाहीर केले होते. पक्षात गटबाजी नसावी आपला एकच गट तो म्हणजे राहुल गांधी.' असे मिलिंद देवरा यांनी यावेळी स्पष्ट केले.