नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झालाय अशी भावना केवळ विरोधकांकडूनच व्यक्त होतेय असं नव्हे तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही व्यक्त केली जात आहे. भुजबळांवर अन्याय झाल्यामुळे ओबीसी समाज भुजबळांच्या पाठिशी उभा असल्याची वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसेंनी केलंय. भुजबळांसोबत ओबीसींच्या समस्यासाठी एकत्रित लढा देणार असल्याचं खडसेंनी जाहीर केलं. 


ओबीसींसाठी भुजबळांसोबत... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओबीसी नेत्यांना सक्रीय राजकारणातून दूर करण्याचं काम प्रयत्नपूर्वक सुरू आहेत, असा आरोपच एकनाथ खडसेंनी केलाय. ओबीसी समाजात नेतृत्वाची पोकळी निर्माण झालीय, ही पोकळी छगन भुजबळ पोकळी भरून काढतील, असा विश्वासही त्यांनी झी २४ तासशी बोलताना यावेळी व्यक्त केलाय. भुजबळांना ओबीसी समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळतोय... मी स्वत: भुजबळांना भेटणार आहे आणि मीदेखील ओबीसी समस्यांवर भुजबळांसोबत लढणार आहे, अशी घोषणा खडसेंनी केलीय. 


भाजपवर टीका 


भाजपने ओबीसी समाजाला आश्वासने दिली, धनगर आरक्षण देण्याचं वचन दिलं... चार वर्षे झाली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत, त्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे. 


विकासाच्या मुद्यावर...


आता आम्ही २०१९ निवडणूक विकासावर लढवण्याचं ठरवलंय. आता विकासाच्या मुद्द्यावर मत मागायचं असं म्हणताना 'विकासाचा मुद्दा आला तर आश्वासनानं काही उरत नाही', असा उपहासात्मक टोलाही एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारला लगावलाय.