मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Maharashtra Government) लवकरच कोसळेल, असं भाकीत राष्ट्रवादीच्या (Ncp) दोन बड्या नेत्यांनी केलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांना असं का वाटतंय? खरंच शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? शिर्डीत पक्षाच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी खळबळजनक दावा केलाय. राज्यातील शिंदे-फडणवीस हे डबल इंजिन सरकार कोसळणार असल्याचं भाकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलंय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही त्याला दुजोरा देताना, सरकार पडण्यामागचं लॉजिक आणि फॅक्ट स्पष्ट केलं. (eknath shinde and devendra fadnavis government will collapse said ncp state president jayant patil at shirdi) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडं राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सरकार पडण्याच्या दाव्याची सत्ताधारी शिंदे गटानं (Eknath Shinde Group) जोरदार खिल्ली उडवलीय. मुंगेरीलाल हे हसीन सपने, अशा शब्दांत कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) निशाणा साधला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) प्रलंबित आहे. त्यात शिंदे गटातील अनेकांना मंत्रीपदं न मिळाल्यानं नाराजी वाढलीय. आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत आहेत. त्या विस्तारातही ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, ते काय भूमिका घेतात, याची उत्सूकता आहे.


शिर्डीत काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेत फाटाफूट झाली, उद्धव ठाकरे सरकार कोसळलं. आता राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, असं भाकीत केलं जातंय. खरंच पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? हे पाहायचं.