कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) यंदा शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) आग्रही आहे. यासाठी एकनाथ शिंदे गटाने अर्ज केला आहे. एकनाथ शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर (Mla Sada Sarvankar) यांनी अर्ज केला आहे. शिवाजी पार्कात गेल्या काही दशकांपासून शिवसेना दसरा मेळावा घेत आहे. त्यामुळे आता या अर्जाबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय. (eknath shinde group mla sada sarvankar give application for dasara melava 2022 at shivaji park dadar)


दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळेल : सदा सरवणकर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी दरवर्षी दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज करतो. यावर्षीही तशी परवानगी मागितली आहे. मी कुठल्या गटाकडून नव्हे तर शिवसेनेकडून परवानगी मागितली आहे. हिंदुत्ववादी विचार मांडण्यासाठी परवानगी मागितली आहे.बाळासाहेबांचे विचार यात मांडले जातील. बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्वाचा विचार घेवून जाणारा नेता हवा", असं सदा सरवणकर यांनी नमूद केलं.


राज ठाकरे प्रमुख पाहुणे?


शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहिले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं विधान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केलंय. त्यामुळे शिवाजी पार्कवर राज ठाकरेही उपस्थित राहणार का? यावरून नव्या चर्चांना उधाण आलंय.