मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उद्योगपती रतन टाटा यांची भेट; जाणून घ्या भेटीचं कारण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी रतन टाटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन केलं. तसंच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
राज्यात सुरू असलेली विकासाची कामे रद्द होणार नाहीत. लोकहिताच्या कामांना स्थगिती नाहीच. मागील सरकारने शेवटच्या दिवसांत घाईघाईने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना स्थगिती दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, आज त्यांनी टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.