मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करूनही उद्धव ठाकरेंशी असलेलं नातं कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय. भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची भीती शिवसेनेतील बंडखोर गटाला होती. पण उद्धव ठाकरे सत्तेत नसतील तर त्यांना काही त्रास होणार यासाठी एकनाथ शिंदेंनी भाजपकडून वचन घेतल्याची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना काही अडचण येणार नाही याबाबत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत बोलणी केली आहे. उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जाणार नाही, असे आश्वासनही भाजपने दिले आहे.


दीपक केसरकर यांचा मोठा दावा


एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीदरम्यान भारतीय जनता पक्षाने (भाजप) शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य न करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा दीपक केसरकर यांनी शनिवारी केला.


सोमय्या यांच्यावर टीका 


केसरकर आणि इतर काही बंडखोर आमदारांनी याआधी सोमय्या यांचे ठाकरे यांच्यावर हल्ले सुरू ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.


केसरकर म्हणाले की, भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी याला सहमती दर्शवली. सोमय्या यांनी आज मला फोन केला आणि सांगितले की आमच्यात आणि फडणवीस यांच्यात झालेल्या कराराची त्यांना माहिती नाही,"


फडणवीसही उद्धव यांचा आदर करतात.


ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना शिवसेनेचे सर्व नेते, आमदार आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. भाजप आपल्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर आरोप करत असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार गप्प आहेत, असा आरोप ठाकरे यांनी शुक्रवारी केला होता. केसरकर म्हणाले, आमच्याप्रमाणे फडणवीसही उद्धवजींचा आदर करतात.