Shiv Sena Symbol: धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाने नेमका काय निर्णय दिला?
धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद झाला. शिंदे गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. तर, पक्षघटनेत बदल केल्याने शिंदे गटाने हरकत घेतली. 17 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
Maharashtra Political Crisis : संपूण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबतच्या (Shiv Sena Symbol) सुनावणीत अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात जोरदार रस्सीखेच सुरु होती. याबाबत निवडणुक आयोगाने (Election Commission India) खूप मोठा निर्णय दिला आहे (Maharashtra Political Crisis). धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद झाला. शिंदे गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. तर, पक्षघटनेत बदल केल्याने शिंदे गटाने हरकत घेतली. 17 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण चिन्हासाठी झालेल्या पहिल्याच सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटानं जोरदार युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत सुनावणी घेऊ नका अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. तर सुप्रीम कोर्टानं आज कुणालाही अपात्र ठरवलेले नाही, त्यामुळे चिन्हाचा निर्णय़ घेण्यास काहीही हरकत नसल्याचा प्रतिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. जेठमलानी यांनी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेत बेकायदा बदल केल्याचा दावाही केला. आता पुढील सुनावणी 17 जानेवारीला होणार आहे. अधिकृत राजकीय पक्षाला अधिकृत चिन्ह द्या अशी भूमिका निवडणुक आयोगाने घेतली आहे. मुळ पक्ष हा महत्वाचा. सर्व कागदपत्र आम्ही सादर केली असल्याचे ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले.
ठाकरे आणि शिंदे गटात सध्या धनुष्यबाण या चिन्हावरुन लढाईत महत्वाची घडामोड घडली आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे-ठाकरे आमनेसामने आले. धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार या फैसला निवडणुक आयोगाकडे गेला. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण चिन्ह कोणत्या गटाला देणार यावर सुनावणी पार पडली. शिंदे गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. शिंदे गटानं सर्व प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर तयार करून नोटरी केल्याचा दावा करत ठाकरे गटाने यावर आक्षेप घेतला आहे. तर ठाकरे गटाकडून 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा दावा करण्यात आला आहे.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकच्या वेळी गोठवलं होत धनुष्यबाण चिन्ह
ऑक्टोबर 2022 मध्ये अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लागली होती. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे नाव धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ लागली होती. अखेर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही गटांना वापरता येणार नाही. असा निर्णय देत निवडणुक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटासा जबरदस्त झटका दिला. यांनतर शिंदे गट ढाल-तलवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरला. तर, ठाकरे गचाने मशाल चिन्हावर ही निवडणुक जिंकली. यावेळी पक्षाच्या नावाबाबतही निर्णय झाला होता. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले. तर, शिंदे गटाने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळले.
सत्ता संघर्षाचा फैसला पुन्हा लांबणीवर
राज्यात ठाकरे आणि शिंदे गटाचं ब्रेकअप होऊन नवीन सरकार स्थापन झालं. या सत्ता संघर्षबाबात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. आता या ब्रेकअपची सुनावणी व्हॅलेंटाईन डेला होणार आहे. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. शिवसेनेतली फूट, विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्य सरकारचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातल्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसंच सत्तासंघर्षावर ठाकरे आणि शिंदे गटाकडूनही याचिका करण्यात आल्या आहेत. यावर आता घटनापीठ 14 फेब्रुवारीला सलग सुनावणी करेल अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय. सुनावणीदरम्यान सर्व काही प्रेमाने होईल अशी कोपरखळीही राऊतांनी मारली.