मुंबई : कोरोना काळात भरमसाठ वीजबिले (Electricity bills) आलीत. कोणीही वीजबिल माफ करण्यासाठी सरकारकडे गेले नव्हते. उलट सरकारनेच 100 युनिटपर्यंत वीजबिल माफीची घोषणा केली. आता हात झटक वीजग्राहकांना नोटीस पाठवत आहेत. आत्तापर्यंतच्या राज्याच्या इतिहासात, असे कधी झाले नाही, असा आरोप करत 72 लाख लोकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकार परिषदेत दिली. आता भाजप महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार आहे, असे ते म्हणाले. ( MSEDCL office to be locked, BJP to agitate - Chandrashekhar Bawankule)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणीही वीजबिल माफ करावे म्हणून कोरोना काळात सरकारकडे गेले नव्हते, उलट 100 युनिटपर्यंतची घोषणा करण्यात आली आणि मग ही घोषणा फेटाळण्यात आली. कोरोना काळांत 6 - 6 महिने मीटर रिडींग करण्याकरिता कोणी गेले नव्हते, मग त्यानंतर भरमसाठ बिले आली, यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांची वीजबिले भरण्याची क्षमता नाही, 72 लाख कुटुंबियांचे वीज कनेक्शन तोडणे म्हणजे 4.5 कोटी लोकांना फटका बसणार आहे. म्हणून 5 फेब्रुवारीला तालुका स्तरावर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार आहोत, भाजप हे आंदोलन करणार आहे. जर कोणी वीज कनेक्शन तोडायला आलं तर भाजपचे कार्यकर्ते हे करू देणार नाही, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.


100 युनिटपर्यंत वीजबिल माफ करावे ही काँग्रेसने घोषणा केली, काँग्रेसला याचे श्रेय मिळू नये यासाठी हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत हाणून पाडण्यात. 12 महिने झाले या महाविकास आघाडी सरकारला त्यांनी श्वेतपत्रिका काढावी, कंपन्यांची परिस्थिती स्पष्ट करावी. आमच्या काळांत कुठेही कनेक्शन तोडलेले नाही उलट जी कनेक्शन बाकी होती ती दिली, असे बावनकुळे म्हणाले.