मुंबई : येत्या दहा वर्षात मुंबईतल्या देवनारच्या कचरा डेपोचं अस्तित्व नाहीसं होईल असा विश्वास मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. कचाऱ्याच्या डोंगरांची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असणारा पाचशे एकहत्तर कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारनं मंजूर केलाय. त्यामुळे येत्या दोन ते तीन वर्षात हे डोंगर नाहीसे करण्यात पालिकेला यश येईल असं अधिका-यांचं म्हणणं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे कचरा डेपो नाहीसा करताना पालिका देवनारमध्ये वीज निर्मिती प्रकल्प उभा करणार आहे. त्यातून दररोज वीस मेगावॉट वीज उपलब्ध होईल...वीज निर्मिती प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण रक्कमेपैकी निम्मी रक्कम महापालिका आपल्या संचित निधीतून वापरणार आहे. 


 सुरूवातीला या कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पातून जवळपास तीन हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लावता येईल. 1927 पासून देवनारमध्ये 132 हेक्टर जमीनीवर कचरा डेपो सुरू आहे. डेपोच्या तीन बाजूना ठाण्याची खाडी आहे तर चौथ्या बाजूला मोठी झोपडपट्टी आहे. सध्यपरिस्थिती या जमीनीवर 20 मजली इमारतीच्या उंचीचे कचऱ्याचे डोंगर उभे आहेत.