मुंबई : लिफ्ट दुर्घटनेचे अनेक प्रकरणं सध्या समोर येत आहेत. अनेक प्रकरणात लिफ्टमधून जात असताना आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक घटना पुन्हा मुंबईत घडलीये. मॉर्निंग वॉकसाठी महिला चौथ्या मजल्यावरून खाली जात असताना 21 ऑक्टोबर रोजी चारकोप परिसरातील बहुमजली इमारतीत ही घटना घडली होती. (Woman dies in elevator collapsed in Mumabi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेने लिफ्टमध्ये प्रवेश केल्यानंतर ती चौथ्या आणि तिसऱ्या मजल्यादरम्यान अडकली. (elevator got stuck) महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला आणि जेव्हा तिच्या मुलाने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विजेचा शॉक लागला आणि वीजपुरवठा बंद झाला. नंतर, इमारतीच्या एका सुरक्षा रक्षकाने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती वेगाने खाली आली आणि तळमजल्यावर कोसळली.


इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, लिफ्ट कोसळल्याने महिलेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यांना नंतर मृत घोषित करण्यात आले. चारकोप पोलिसांनी नंतर अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.